Belagavi

लष्करी हद्दीतील रस्ते नागरिकांसाठी खुलेच; ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांचे स्पष्टीकरण!

Share

लष्करी हद्दीतील रस्ते बंद करण्यात आलेले नसून नागरिकांसाठी ते खुलेच आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव काही व्यक्ती आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याचे स्पष्टीकरण ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी दिले.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. लष्करी हद्दीतील रस्ते बंद केल्याची पसरलेली अफवा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांची तपासणी करण्याचा अधिकार लष्कराला असून, संशयास्पद व्यक्तींना लष्करी हद्दीत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच अवजड वाहनांना कॅन्टोन्मेंट हद्दीचा शॉर्टकट म्हणून वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सुरक्षितता आणि रस्त्यांचे संरक्षण लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Tags: