बेळगावच्या ज्येष्ठ साहित्यिका आणि निवृत्त इंग्रजी प्राध्यापिका डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांच्या ‘बेळगु जगव मगळु’ या बालकवितासंग्रहाला कलबुर्गी येथील श्री शिवयोगी शरण बसव ट्रस्टचा २०२३ सालचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीदेवी हच्चडद आणि डॉ. नानासाहेब हच्चडद यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले शिवकवी उळवी श्री हुलेप्पनवरमठ यांच्या कन्या असलेल्या डॉ. गुरुदेवी यांनी ‘अज्जीगे जय जय जय’, ‘रीच बॉट’, ‘बेळगु जगव मगळु’, ‘नन्न हक्कु नन्न हेम्मे’ आणि ‘अप्पा ननगे बेकु’ हे बालकवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.
त्यांच्या बालसाहित्याला यापूर्वी बेळगाव जिल्हा साहित्य प्रतिष्ठानचा पी. विजयकुमार दत्तक पुरस्कार, वे. मू. श्री वीरय्या आणि मातोश्री गदिगेम्मा करविनकोप्पमठ दत्तक पुरस्कार, साहित्य संस्कृती प्रतिष्ठान बैलहोंगलचा बालसाहित्य ज्योती पुरस्कार तसेच बेळगाव जिल्हा लेखिका संघाचा श्रीमती विद्या हुंडेकर दत्तक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
याशिवाय नाडोज आणि बेळगावच्या ‘लोकदर्शन सरल मातु’ या नियतकालिकांकडून ‘अज्जीगे जय जय जय’ या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखितासाठी रोख पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
डॉ. गुरुदेवी यांच्या या यशाबद्दल बेळगावमधील साहित्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments