Belagavi

फटाक्यांच्या ठिणगीने वडगावात गवताची गंजी जळून खाक

Share

वडगावातील शेतकरी गल्ली येथे भोंमेश बिरजे यांच्या घराच्या मागील बाजूस साठवून ठेवलेली गवताची गंजी आगीत जळून खाक झाली. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

जनावरांसाठी साठवलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. आधीच चाऱ्याची टंचाई असताना साठवलेले गवत जळाल्याने बिरजे कुटुंबासमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनावेळी आकाशात सोडलेल्या फटाक्याची किंवा बाणाची ठिणगी पडल्याने आग लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.

Tags: