Belagavi

बेळगाव : चन्नम्मा सर्कल परिसरात कित्तूर उत्सवाचा जल्लोष

Share

ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकणाऱ्या पहिल्या धीरंगना वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या २०२ व्या विजयोत्सवानिमित्त आयोजित कित्तूर उत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी शहरातील चन्नम्मा सर्कल येथे कन्नड संघटनांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना कन्नड क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदिरगी म्हणाले की, २३ ऑक्टोबर रोजी ब्रिटिशांविरुद्ध प्रथम बंड पुकारून कित्तूर राणी चन्नम्मा यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते आणि ब्रिटिशांना हादरवून सोडले होते. परंतु दुर्दैवाने देशाच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख अधिक आढळतो. प्रत्यक्षात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी १८५७ मध्ये लढा दिला होता, परंतु त्याआधीच १८२४ मध्ये आपले कित्तूर संस्थान वाचवण्यासाठी राणी चन्नम्मा यांनी लढा दिला होता, हा इतिहास आहे.

कन्नड संघटनांच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो. राणी चन्नम्मा यांचे शौर्य आणि यशोगाथा आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनात आचरणात आणावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

Tags: