Belagavi

नवरात्रीचा भक्तिमय उत्साह… विद्युत रोषणाईचा झगमगाट… आणि आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी उसळलेला भक्तिसागर!

Share

बेळगावच्या तानाजी गल्ली कॉर्नर परिसरात, ओल्ड पी. बी. रोड उड्डाणपुलाखाली वसलेले श्री रेणुका देवी मंदिर सध्या आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे!

मंदिराची देखणी सजावट आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवसाला पावणारी देवी, अशी श्रद्धा असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दररोज दुपारी या ठिकाणी चंडी होम आणि दररोज रात्री विशेष आरती होत आहे.

विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने आईच्या चरणी नतमस्तक होत आहेत.

भक्ती, श्रद्धा आणि दिव्य रोषणाईचा अनोखा संगम…

आई रेणुका देवीच्या दर्शनाने बेळगावमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच बहरला आहे!

आपणही सहकुटुंब श्री रेणुका देवी मंदिराला अवश्य भेट द्या! आई रेणुका देवीचे दर्शन घ्या आणि तिचा आशीर्वाद लाभवा!

Tags: