समर्थ नगर बेळगाव येथील श्री एकदंत युवक मंडळ एस टी एम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ च्या वतीने एस टी एम ची आई भवानी देवीला बुधवार दिनांक 13/10/26 रोजी सायंकाळी ओठी भरून मंडळाच्या वतीने चांदीचे हार अर्पण करण्यात आले यावेळी गल्लीतील विविध मंदिरे श्री रेणुका देवी मंदिर समर्थ नगर कॉर्नर, तसेच समर्थ नगर मधील जागृत मंदिर श्री ब्रम्हदेव येथे सुद्धा ओठी भरण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी कळस गीडी,व आरती घेऊन मिरवणुत सहभाग झाले होते व सर्व देवतांचे जयजयकार करण्यात आला यावेळी पारंपरिक वेष भूषा करून देवीच्या रुपात अनेक मुली उपस्थित झाले होते यावेळी समर्थ नगर मधील वातावरण भक्तिमय झाले होते व त्या नंतर महाआरती करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी समर्थ नगर मधिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Recent Comments