Belagavi

सह्याद्री नगरात घराला आग, सुदैवाने बचावले दोन बालकांचे प्राण

Share

बेळगावातील सह्याद्री नगर येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. घरातील दोन बालकांचे प्राण सुदैवाने बचावले.

सह्याद्री नगरातील श्रीदेवी जोशी यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात ही घटना घडली. या घरात रूपा नाशीपुडी या आपल्या दोन मुलांसह भाड्याने राहतात.

अमावास्येनिमित्त रूपा या घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या होत्या. यावेळी शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागली आणि आतील मुले ओरडू लागली. मुलांचा आवाज ऐकून घरमालकीण श्रीदेवी जोशी तातडीने धावल्या आणि धुराने भरलेल्या घरातून दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.

श्रीदेवी जोशी यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. ही घटना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: