अपत्यहीन दांपत्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या महाराष्ट्रातील मिरज येथील प्रसिद्ध सचिन हॉस्पिटल व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये येत्या ११ ऑक्टोबर रोजी मोफत वंध्यत्व निवारण आणि स्त्री-पुरुष रोगांवर मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात शेकडो दांपत्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे. या वेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर योग्य उपाय सुचवणार आहे. विशेषतः महिलांमधील वंध्यत्व, पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता, गर्भाशयातील गाठी, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असणे आणि वारंवार होणारा गर्भपात यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्यांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे कसा मार्ग काढता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

या शिबिरात सचिन हॉस्पिटलमधील अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी लॅब (IVF), स्पर्म बँक आणि एग डोनेशन सोयींबद्दल माहिती दिली जाईल. तसेच लैंगिक समस्या व शारीरिक दुर्बलतेवरही तज्ज्ञांकडून प्रभावी उपचार उपलब्ध असणार आहेत.
शिबिरात सहभागी होणाऱ्यांची प्राथमिक तपासणी मोफत केली जाईल, तसेच पुढील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे.
मिरज येथील छत्रपती शिवाजी रोडवर, हॉटेल प्रियदर्शनीजवळ असलेल्या सचिन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी डॉ. सचिन (९४२२५८०८४२ / ९७६५०१०८३४) किंवा डॉ. नेहा (९४२१९३२४०१) यांच्याशी संपर्क साधावा.


Recent Comments