hubali

हुबळीत रौडीशीटर हॅरिस पठाणला जीवे मारण्याचा प्रयत्न

Share

हुबळी येथील शांतीनगर मार्केट परिसरात एका लग्नसमारंभात कुटुंबीयांसह गेलेल्या हॅरिस पठाण या रौडीशीटरला लक्ष्य करून त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप स्वतः हॅरिस पठाण याने केला आहे.

या घटनेतून हॅरिस पठाण कोणताही गंभीर दुखापत न होता सुदैवाने बचावला असून, जीव वाचणे हेच मोठे नशीब असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. नुकत्याच घडलेल्या फिरोज पठाण हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या काही व्यक्तींचाच या कटामागे हात असल्याचा आरोप हॅरिसने केला आहे. तसेच यामागे काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या प्रबळ नेत्यांचेही सहकार्य असल्याचे त्याने म्हटले आहे.

या घटनेवर काँग्रेस नेते अब्दुल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून, या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हॅरिस पठाण यांनी केलेल्या आरोपांमधील तथ्य आणि घटनेची पूर्ण माहिती पोलिसांच्या सखोल तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

Tags: