हुबळी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या विधानावर शशिकांत पडसलगी गुरुजी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या एमएसपी, इथेनॉल आणि स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी हुबळीत मोठे आंदोलन झाले होते. या वेळी केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने संतापातून हे विधान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते विधान मागे घेत असल्याचे सांगत, भाजप कार्यकर्ते आणि जोशी यांच्या समर्थकांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आपण नेहमीच महिलांचा आदर करतो, असे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीच पक्षातीत आणि जातीतीत भावनेतून आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.


Recent Comments