Belagavi

बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गाला निधीचा फटका: खासदार जगदीश शेट्टर यांचा राज्य सरकारवर आरोप

Share

बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्ग निधीअभावी रखडला असून राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला.

दिवंगत सुरेश अंगडी रेल्वेमंत्री असताना या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली होती. बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली तरी आर्थिक निधी न मिळाल्याने पुढील कामे रखडली असल्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी ४०० ते ४५० कोटी रुपयांची गरज असताना सरकारने आतापर्यंत केवळ ५० कोटी रुपये दिले आहेत. बेळगावात १७०० एकर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत. मात्र सरकारकडे रेल्वे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही.

दरम्यान, बेळगाव विमानतळ रस्ता व टर्मिनलचे काम नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रेल्वे स्थानकावरील पदचारी पूल आणि सरकता जिना लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे शेट्टर यांनी सांगितले.

Tags: