बेळगावातील गोवावेस चौक परिसरात अपंगत्वाचे सोंग घेऊन भिक मागणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे झाला आहे. टिळकवाडी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोवावेस चौकात एक महिला दिव्यांग असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, परमेश साळुंखे आणि शुभम हुली यांच्या पथकाने टिळकवाडी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी पाहणी केली.

तपासणीदरम्यान संबंधित महिला केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हात-पाय निकामी असल्याचा बनाव करत असल्याचे स्पष्ट झाले.
नागरिकांनी अशा कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये आणि संशयित भिक्षुक किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.


Recent Comments