बेळगावात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत धार्मिक व सामाजिक वातावरणात ईद-ए-मिलाद साजरी केली. अल् फला संघटनेच्या पुढाकाराने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला.

बेळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून साधेपणाने साजरा झाला. अल् फला संघटनेचे प्रमुख अब्दुल कादर घीवाले यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही समाजातील बांधव जिल्हा रुग्णालयात एकत्र आले. त्यांनी विविध प्रभागांतील रुग्णांची विचारपूस करत फळवाटप केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

सण केवळ आनंदापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमांतून साजरे केल्यास त्यांना खरा अर्थ प्राप्त होतो, असे अब्दुल कादर घीवाले यांनी म्हटले.

या उपक्रमाला फैजान भाई, सुरेश कांग्राळकर, जुबेर मुगुटखान आणि अब्दुल गफूर घीवाले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.



Recent Comments