Belagavi

मंत्री हेब्बाळकरांच्या हस्ते रामलिंगेश्वर मंदिरासाठी धनादेश सुपूर्द

Share

बाळेकुंद्री बुद्रुक या गावात उभारण्यात येत असलेल्या रामलिंगेश्वर मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी मंजूर झालेला निधीचा धनादेश लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंदिर ट्रस्ट समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

बाळेकुंद्री बुद्रुक या गावात सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला सुरुवात झाली असून याकरिता मंजूर झालेल्या निधीचा धनादेश ट्रस्ट कडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंदिरांच्या विकासाला प्राधान्य दिले जात असून, बाळेकुंद्री बी.के. येथील श्री रामलिंगेश्वर मंदिराचा परिसर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र ठरेल. हा विकास केवळ इमारत बांधकामापुरता मर्यादित नसून आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे हे कार्य आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या कामाला पूर्ण सहकार्य केले जात असून, मंदिर उभारणीचे काम नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी ग्रामस्थ आणि ट्रस्ट समितीने योग्य देखरेख ठेवावी.”

धनादेश हस्तांतरण प्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मंदिर ट्रस्ट समितीचे होनगौडा पाटील, सुरेश काळोजी, प्रवीण पाटील, प्रल्हाद पाटील, नागेश देसाई, प्रेम कोळकार, अफसर जमादार, नूर मुल्ला यांच्यासह गावातील प्रमुख आणि मंदिर ट्रस्ट समितीचे सदस्य उपस्थित होते.

गावातील प्रमुखांनी मंदिराच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांचे आभार मानले.

Tags: