बसव कायकजीवी संघ आणि राष्ट्रीय बसव दल बेळगाव जिल्हा तर्फे गोडधोड वाटून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

येथील विश्वगुरू बसव मंडपात माजी सैनिक प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

देशसेवेताना एक हात गमावला असला तरी माझी देशभक्ती कमी झालेली नाही, असे प्रतिपादन माजी सैनिक प्रकाश पाटील यांनी केले.

यावेळी उपस्थितांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. प्रत्येकाने धर्मासोबतच राष्ट्रभक्ती जपली पाहिजे, असा संदेश आनंद गुडस यांनी दिला.

या सोहळ्यास सूर्यकांत भांवी, अशोक बेंडिगेरी, शंकर गुडस, संतोष गुडस यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



Recent Comments