Belagavi

‘आपले सेवकरी’ तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Share

८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘आपले सेवकरी’ तर्फे विविध भागांतील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करून स्वातंत्र्यदिन अर्थपूर्णरीत्या साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुतगे येथील मराठी व कन्नड प्राथमिक शाळा, शिंदोळी येथील कन्नड मुलांची शाळा आणि निलजी येथील मराठी मुलांची शाळा या ठिकाणच्या शेकडो गरीब विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

या समाजोपयोगी उपक्रमात भाजप ग्रामीण घटकाचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, उमेश पुरी, कृष्णा पाटील, दीपक पुरी, महावीर गुडाज, सूरज पाटील, परशुराम केदार आणि किरण अंची यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे (SDMC) पदाधिकारी आणि सदस्यांनी आयोजकांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Tags: