ऐतिहासिक विजापूर शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी खुल्या वाहनातून संचलनाची (परेड) पाहणी केली. पोलीस पथके आणि विविध शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या संचलनात सहभाग घेतला.

या सोहळ्यास विजापूर शहराचे आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ, जिल्हाधिकारी के. आनंद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ऋषी आनंद, पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तर खासदार रमेश जिगजिणगी या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन आणि विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.



Recent Comments