Belagavi

बेळगावात शिवानंद नीलण्णावर यांच्या निवासस्थानी ईडीची दुसऱ्या दिवशीही धाड

Share

बेळगाव येथील व्यावसायिक शिवानंद नीलण्णावर यांच्यावर बेकायदेशीर पैशांच्या व्यवहाराप्रकरणी (मनी लाँड्रिंग) ईडीने गुन्हा दाखल केला असून, कालपासून सुरू असलेली शोधमोहीम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

बेळगावमधील शिवबसवनगर येथील एम. एच. टॉवरमधील शिवानंद नीलण्णावर यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. गोवा आणि मंगळुरु येथील ईडी अधिकाऱ्यांचे पथक महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.

सीआरपीएफच्या कडक सुरक्षेत ही कारवाई सुरू आहे. मात्र, कारवाईदरम्यान शिवानंद नीलण्णावर उपस्थित नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्नी व भावाला बोलावून त्यांच्यासमक्ष महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.

Tags: