Belagavi

बेळगावात महिलांसाठी विशेष ‘PR16’ जिमचा शुभारंभ; मार्शल आर्ट्स, योगासनांचे मिळणार प्रशिक्षण

Share

बेळगाव येथील रामतीर्थ नगरमध्ये महिलांचे आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मरक्षणासाठी ‘PR16 Women’s Fitness and Combat Sports’ या नवीन जिमचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ झाला.

आमदार आसिफ सेठ, राहुल जारकीहोळी यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला आणि महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.आमदार असिफ सेठ यांनी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन असे केंद्र सुरू करणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना संस्थेच्या प्रमुख अंजली अक्षय घसारी यांनी सांगितले, कि महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या जिममध्ये महिलांसाठी स्वतंत्रपणे पात्र महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून अ‍ॅरोबिक्स, योग आणि झुम्बाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांच्या फिटनेससोबतच मुले आणि मुलींसाठी ज्युडोचे (मार्शल आर्ट्स) विशेष प्रशिक्षणही येथे सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय पदक विजेते प्रशिक्षक मुलांना मार्गदर्शन करणार असून भविष्यात राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

संस्थेच्या सहसंस्थापिका ज्योती कांग्राळकर आणि अंजली अक्षय घसारी यांनी या जिमची स्थापना केली असून, सहाना एस. आर. प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला आमदार आसिफ सेठ, युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी, उपमहापौर हनुमंत कोंगाळी , युवा नेते ताहीर सय्यद, माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय श्रीशैल हुलगेरे, अराविंद कारची, शकीर कितुर, समाजसेवक सुरेश यादव, अफरोज सनदी आणि आंतरराष्ट्रीय ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील उपस्थित होत्या.

Tags: