Belagavi

बडेकोळ्ळमठ अपघातप्रवण मार्गावर कायमस्वरूपी कामाला गती

Share

पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बेळगावजवळील बडेकोळ्ळमठ परिसरातील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला एनएचएआयने अंतिम मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस कमी होताच कायमस्वरूपी कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

बेळगाव तालुक्यातील बडेकोळ्ळमठ परिसरातील पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी बेळगाव शहर पोलीस विभागाने केलेल्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाऊस ओसरल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.

कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एनएचएआयने अपघातप्रवण परिसरात पाण्याचे ड्रम, वाहतूक कोन, परावर्तित मानवी आकृत्या आणि दिशादर्शक फलक बसविले आहेत.

या तात्पुरत्या सुरक्षाव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी एनएचएआयच्या समन्वयाने काम करत आहेत. या उपाययोजनांमुळे भविष्यात या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

Tags: