Belagavi

धारवाड-बेळगाव रेल्वे प्रकल्पासाठी ७० कोटी रुपये मंजूर; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

Share

बहुप्रतिक्षित बेळगाव-धारवाड थेट रेल्वे प्रकल्पाच्या भू-संपादन प्रक्रियेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

आज माध्यमांशी बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, धारवाड येथील विशेष भू-संपादन अधिकारी (SLAO) शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम करत आहेत.

काही ठिकाणी जमिनीचा दर वाढवून मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, उघडपणे चर्चा करून निश्चित केलेला दर वारंवार बदलणे शक्य नाही. तरीही अधिकारी सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन समजूत काढण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: