Belagavi

मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ : जुना पूल पाण्याखाली

Share

बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप्प धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीला पूर आला असून, कंग्राळी के.एच. येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सततच्या पावसामुळे राकसकोप्प धरण भरल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, कंग्राळी के.एच. येथील जुना पूल यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा जलमय झाला आहे. त्यामुळे परिसरातील काही गावांचा रस्ता संपर्कही विस्कळीत झाला आहे.

नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी नदीकाठावरील शेकडो एकर शेतीत शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: