अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एसएसएलसी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ. जयतीर्थ कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे आणि मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी एसएसएलसी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पूर्विका शेट्टी, श्रावणी मोरे, भक्ती कुंभार यांच्यासह विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच आठवी आणि नववीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात आले.
संस्थेतील उत्कृष्ट शिक्षिका श्यामल दड्डीकर, माया निलजकर तसेच कर्मचारी वर्गाचाही यावेळी सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.


Recent Comments