दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील सागरपेठ येथे घरासमोर झोपलेल्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चन्नगिरी तालुक्यातील बसावापट्टण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सागरपेठ येथील मुख्य रस्त्यावरील शेतकरी कोट्टूर हालेश यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे. जवळच डोंगराळ भाग असल्याने अन्नाच्या शोधात आलेला बिबट्या चक्रावून टाकणाऱ्या वेगाने कंपाऊंडवरून आत शिरला आणि कुत्र्याला घेऊन गेला.

गेल्या चार महिन्यांपूर्वीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याच परिसरात एका बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, आता पुन्हा बिबट्याचा वावर सुरू झाल्याने सागरपेठ आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा धोका वाढल्याने वनविभागाने तात्काळ मोहीम राबवून त्याला पिंजऱ्यात डांबून जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.


Recent Comments