स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीसाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध काम करावे, अशा सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मोहम्मद रोशन बोलत होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वज आणि ध्वजस्तंभासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. प्लास्टिक ध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच निमंत्रण पत्रिका शिष्टाचारानुसार तयार करून संबंधितांना वेळेत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करावी. तसेच सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक समितीने आपली जबाबदारी ओळखून तयारी पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments