बीदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात जमिनीच्या वादातून एका महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

बीदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील गावात ३२ वर्षीय अनिता नावाच्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही महिला घरात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे ही घटना घडल्याचे समजते.

मृत महिलेच्या पतीचा चुलत भाऊ कैलास बिरादार याच्यावर या हत्येचा आरोप आहे. आरोपी कैलास याने गेल्या वर्षीही जमिनीच्या कारणावरून मृत महिलेच्या पतीसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर खटकचिंचोळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सध्या गावात तणावाचे वातावरण असून फरार आरोपी कैलासच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.


Recent Comments