अपत्यप्राप्तीसाठी उत्सुक असलेल्या दांपत्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मिरज येथील प्रसिद्ध सचिन हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये २१ जून रोजी मोफत वंध्यत्व निवारण व मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.


रविवार, २१ जून रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपचार केंद्रामध्ये राष्ट्रीय आणि आण्तरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांच्या समस्या ऐकून घेत योग्य उपाय सुचवले. यामध्ये प्रामुख्याने स्त्री वंध्यत्व, पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता, गर्भाशयातील गाठी, बंद फॅलोपियन ट्यूब आणि वारंवार होणारा गर्भपात अशा क्लिष्ट समस्यांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशा प्रकारे मात करता येते, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगशाळा, स्पर्म बँक आणि डोनर सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात आली. याशिवाय लैंगिक समस्या आणि शारीरिक दुर्बलतेवरही येथे प्रभावी उपचार केले जातात. शिबिरात सहभागी झालेल्यांची प्राथमिक तपासणी मोफत करण्यात आली, तसेच पुढील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
मिरज येथील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील हॉटेल प्रियदर्शिनीजवळ असलेल्या सचिन हॉस्पिटलमध्ये या शिबिरेचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टर डॉ. सचिन (9422580842 / 9765010834) किंवा डॉ. नेहा (9421932401) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात शेकडो दांपत्यांनी उपस्थित राहून तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला व अत्याधुनिक उपचारांची माहिती घेतली.


Recent Comments