शिवसेना (उबाठा गट ) बेळगाव शहर शाखा आणि राजश्री डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील एकूण ६०५ विद्यार्थ्यांना सुमारे ८,५०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान राजश्री डेव्हलपर्सच्या संस्थापिका राजश्री तुडयेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माता-पिता आणि गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, शिवसेना उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रशांत पवार, प्रवीण तेजम, तानाजी पावशे, एस. के. पोटे, प्रदीप सुतार, प्रकाश शिवाजी, विठ्ठल उंदरे तसेच युवासेनेचे विनायक हुलजी आणि वैभव कामत उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी याविषयी आपले विचार मांडले.
शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निशा गावडे यांनी केले.


Recent Comments