हुबळीमधील उणकल भागात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने पियुसी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. श्रावणी मारुती काळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रावणी हुबळीतील विद्यानगरमधील कनकदास कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या द्वितीय वर्ष पियुसी परीक्षेच्या निकालात तिला ७७ टक्के गुण मिळाले होते. मात्र, तिला ८५ टक्क्यांहून अधिक गुणांची अपेक्षा होती. गुणांची ही टक्केवारी कमी आल्याने ती प्रचंड मानसिक दडपणाखाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणीही नसताना श्रावणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. श्रावणीने केवळ गुणांच्या तणावाखाली येऊन हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, याप्रकरणी विद्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments