हुबळीमध्ये सध्या ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांनी वातावरण तापले आहे. केशवापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर आता पीडितेचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून, या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

हुबळीतील कुसुगल रोड भागातील तरुणीने कमरीपेठ येथील मुफीस मियानवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत रविवारी पीडितेने या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना राजकीय नेत्यावर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर काही वेळातच पीडितेचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या वादात पीडितेने आता हुबळीतील एका काँग्रेस युवा नेत्याचे नाव घेतले आहे. “हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे काँग्रेस नेत्याचा हात आहे. माझ्यावर अन्याय झाला तेव्हा हे नेते कुठे होते? आता मी तक्रार केल्यावर मला बदनाम केले जात आहे,” असा आरोप तिने केला आहे.
व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडिओमध्ये पीडितेने आपण घरच्यांना न सांगता नोंदणी पद्धतीने लग्न करणार होतो, अशी कबुली दिल्याचे दिसत आहे. तसेच, या लग्नाविषयी माहिती मिळाल्यानंतर ‘आरएसएस’ कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन केले होते, असा उल्लेखही तिने या व्हिडिओत केला आहे. सध्या हे सर्व जुने पुरावे आणि व्हिडिओ पोलिसांच्या तपासाचा मुख्य भाग बनले आहेत.
नेहा हिरेमठ प्रकरणानंतर शांत झालेल्या हुबळीत पुन्हा ‘लव्ह जिहाद’चे गुन्हे समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. केशवापूर पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.


Recent Comments