hubbali

हुबळी-धारवाडमध्ये पोलीस ध्वज दिन उत्साहात साजरा

Share

हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १९६५ मध्ये कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या स्थापनेनिमित्त जुन्या सीएआर मैदानावर संचलन आणि मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला.

हुबळीतील जुन्या सीएआर मैदानावर झालेल्या या विशेष सोहळ्यात पोलीस संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निमंत्रित पाहुण्यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली.

या पथसंचलनात पोलीस बँडसह सीएआर, हुबळी उत्तर, दक्षिण उपविभाग, धारवाड उपविभाग तसेच महिला आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध संचलनाद्वारे पोलीस दलाच्या कार्यतत्परतेचे दर्शन घडवण्यात आले. या सोहळ्याला पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: