hubbali

हुबळीजवळ एसटी बसचा भीषण अपघात; ६ प्रवासी जखमी

Share

हुबळी शहराच्या बाहेरील कुंदगोळ क्रॉसजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात राज्य परिवहन मंडळाची बस अपघाताग्रस्त झाली आहे. या दुर्घटनेत सहा प्रवासी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हुबळीहून शिरसीच्या दिशेने निघालेली मुंडगोड डेपोची बस (KA-31 F 1536) पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. याच वेळी समोरून एक मोठा ट्रक आल्याने बस चालकाने आपली बस पुन्हा डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गडबडीत बस समोर चाललेल्या ट्रकवर मागून जोरात आदळली.

या धडकेमुळे बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सहा प्रवाशांना तातडीने उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: