hubbali

हुबळीमध्ये केबल वायरच्या विळख्यात अडकून भीषण अपघात : दोन तरुणांचा मृत्यू

Share

हुबळीमधील गोकुळ रोडवर केबल वायरमध्ये दुचाकी अडकून पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अर्बन ओएसिस मॉलजवळ काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली असून, रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या वायरमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

काल रात्री अर्बन ओएसिस मॉल परिसरामध्ये हे दोन्ही तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या केबल वायरमध्ये त्यांचे वाहन अडकले. यामुळे दुचाकी जोरात घसरली आणि दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.

घटनेची माहिती मिळताच गोकुळ रोड पोलीस स्टेशन आणि उत्तर वाहतूक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

Tags: