hubbali

हुबळीमध्ये दिवसाढवळ्या चोरांचा धुमाकूळ

Share

हुबळीमध्ये दिवसाढवळ्या चोरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरांनी शिताफीने चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हुबळीमधील कारवार रोडवर ही घटना घडली असून दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरांनी भरदिवसा पळवून नेली आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये चोरांची ही हातचलाखी स्पष्टपणे दिसून येत आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक हादरले असून शहरात वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

या प्रकरणी वाहन मालकाने जुने हुबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Tags: