hubbali

हुबळीच्या किम्स रुग्णालयात रुग्णांची हेळसांड; उपचारांअभावी ताटकळण्याची वेळ

Share

हुबळी येथील किम्स रुग्णालयात रात्रीच्या वेळी उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाचा फटका बसत आहे. गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांना बेड रिकामे नसल्याचे सांगून तासनतास रुग्णवाहिकेमध्येच ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एका रस्ते अपघातातील जखमीला रुग्णालयात आणले असता, अर्धा तास उलटूनही कर्मचाऱ्यांनी त्याला आत घेण्यास नकार दिला. अखेर रुग्णवाहिका चालकाने या अनागोंदीचा व्हिडिओ प्रसिद्ध करून नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: