hubbali

डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षपदाला ६ वर्षे पूर्ण; हुबळीत जल्लोष

Share

केपीसीसी अध्यक्ष म्हणून सहा वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल हुबळीत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातील सर्वोदय चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा आनंदोत्सव साजरा केला. डी.के. शिवकुमार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला दिलेली मजबुती आणि त्यांच्या नेतृत्वाचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे जावई रजत उळागड्डीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्रीपदासाठी दिकेशीच्या नावाचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला.

केपीसीसी अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: