हुबळी शहरात आज पहाटेच लोकायुक्त पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘क्रेडाई’च्या एका बड्या अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली आहे.

‘क्रेडाई’चे मुख्य अभियंता वसंतप्पा नाईक यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अक्षय कॉलनी येथील वसंतप्पा नाईक यांच्या घरी पहाटेच लोकायुक्त पथकाने धडक दिली. वसंतप्पा नाईक हे सध्या बेंगळुरू येथे ‘क्रेडाई’चे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असून, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांची बदली बेंगळुरूला झाली होती. आज सकाळी एकाच वेळी बेंगळुरू आणि हुबळी येथील त्यांच्या मालमत्तांवर लोकायुक्तांनी छापे टाकले आहेत.
सध्या लोकायुक्त पोलिसांकडून घराची आणि कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. या कारवाईत नेमकी किती मालमत्ता आणि रोकड जप्त करण्यात आली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लवकरच सविस्तर तपशील मिळण्याची शक्यता आहे.


Recent Comments