hubbali

हुबळीत दारूच्या नशेत राऊडी शीटरकडून मित्रावर जीवघेणा चाकू हल्ला

Share

हुबळीतील नवनगर भागात दारूच्या नशेत स्वतःवरील नियंत्रण सुटलेल्या एका राऊडी शीटरने आपल्याच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मित्र गंभीर जखमी झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी आरिफ नदाफ याने मद्यपान करून सोबत असलेल्या मित्रांना धमकावण्यास आणि त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. हे पाहून त्याचा मित्र राजू नाईक याने आरिफला समजावण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याचे सांगितले.

राजूने दिलेला सल्ला आरिफला आवडला नाही आणि त्याचा राग अनावर झाला. “तू मला सांगणारा कोण?” असे म्हणत आरिफने राजूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्याजवळील धारदार शस्त्राने राजूच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला राजू कसाबसा आरिफच्या तावडीतून सुटला आणि मित्रांच्या मदतीने उपचारासाठी किम्स रुग्णालयात दाखल झाला.

सदर घटना एपीएमसी नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी आरिफ नदाफ याला अटक केली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Tags: