State

आमच्या सरकारचे कार्य सामाजिक बांधिलकीतून : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार सामाजिक पायावर काम करत आहे. गृहलक्ष्मी योजना घराघरात पोहोचवून सरकारने महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

कार्कळ येथील कुक्कुंदूर येथे किसान सभा सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा टप्पा गाठल्याचे सांगितले. आतापर्यंत १.२४ कोटी महिलांना २६ हप्त्यांचे एकूण ५२ हजार रुपये मिळाले असून उडुपी जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार नसला तरी गृहलक्ष्मीचे सर्वाधिक लाभार्थी येथेच असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सुरू केलेली सीइटी यंत्रणा आज संपूर्ण देशासाठी आणि शिक्षण हक्क कायद्यासाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांचे पाच दशकांचे निस्वार्थ समाजसेवा आणि शैक्षणिक कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली, मंत्री एच. सी. महादेवप्पा, मधू बंगारप्पा, आमदार सुनील कुमार, विधान परिषद सदस्य आयव्हन डिसोझा, माजी मंत्री रमानथ राय, विनय कुमार सोरके, जयप्रकाश हेगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: