hubbali

हुबळीत खिसेकापूंची टोळी सक्रिय;चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

Share

हुबळी शहरात सध्या सराईत खिसेकापूंच्या टोळीने उच्छाद मांडला असून या टोळीचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आतापर्यंत बस स्थानकापुरते मर्यादित असलेले हे चोरटे आता थेट रस्त्यांवर सक्रिय झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हुबळीतील रेल्वे स्टेशन रोड, जनता बाजार आणि दुर्गाद बैल यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही टोळी परगावच्या प्रवाशांना आपले लक्ष्य करत आहे. रस्त्याने चालणाऱ्या प्रवाशांना बोलण्यात गुंतवून, त्यांच्याशी जवळीक साधून किंवा गंमत करण्याच्या बहाण्याने ही टोळी अत्यंत सफाईदारपणे खिसे कापते. चोरटे मोबाईल आणि पाकीट लंपास केल्यानंतर लगेच दुसऱ्या साथीदाराकडे सोपवून तिथून पसार होतात.

परगावाहून आलेल्या निष्पाप प्रवाशांना आपले पैसे आणि मोबाईल हरवल्यानंतर मोठे हाल सोसावे लागत आहेत. अनेक प्रवाशांना घरी जाण्यासाठी इतरांकडे पैसे मागावे लागल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. दरम्यान, या चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, हुबळी पोलीस या टोळीला गजाआड कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: