एका खाजगी कार्यक्रमासाठी हुबळीत आलेल्या सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने आज येथील ऐतिहासिक श्री सिद्धारूढ मठाला भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी त्याने सिद्धारूढ स्वामींच्या चरणी विशेष पूजा अर्पण केली.


दर्शनानंतर सोनू निगमने सिद्धारूढ स्वामींच्या समाधीजवळ बसून सुमारे दहा मिनिटे ध्यान केले. यावेळी मठातील शांतता आणि आध्यात्मिक वातावरणाने तो भारावून गेला होता. याप्रसंगी सिद्धारूढ मठ ट्रस्टच्या वतीने सोनू निगमला सिद्धारूढ स्वामींची मूर्ती भेट देऊन त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. सोनू निगमला पाहण्यासाठी मठाच्या परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.



Recent Comments