हुबळी येथील मंटूर रस्त्यावर झोपडपट्टी विकास मंडळाच्या वतीने आयोजित घर वाटप कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लावलेले एक भव्य कटआउट कोसळून तिघे जण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाकडून मंटूर रस्त्याच्या दुतर्फा आणि कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री सिद्दरामय्या, मंत्री जमीर अहमद खान आणि इतर काँग्रेस नेत्यांचे मोठमोठे कटआउट्स उभारण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि मंत्री जमीर अहमद यांचे छायाचित्र असलेले हे कटआउट अचानक कोसळले आणि त्याखाली दबले गेल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी केएमसी-आरआय (किम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलीस या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


Recent Comments