बेळगाव शहर पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांविरुद्ध मोठी मोहीम राबवत जुगार खेळणाऱ्या ७ आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ५ अशा एकूण १२ जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार फुलबाग गल्लीतील एका घरावर छापा टाकला. यावेळी दिनेश वाळवेकर, राहुल जाधव, दानिश दलायत, पवन जलगार, नितीन सोमनाजे, लक्ष्मण हिरेकोप्प आणि मजुनाथ गिडगेरी या ७ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ९,६०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत, शहापूर पोलिसांनी प्रियंका हॉटेल परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या जिनेंद्र अल्ला, प्रशांत काकतकर आणि किरण शदारे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. तसेच एपीएमसी पोलिसांनी रॉयल पब्लिक स्कूल जवळून कुमार चरंतीमठ आणि विजयकुमार सुतगट्टी या दोघांना ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी अटक केली आहे.
या सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपआयुक्तांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.


Recent Comments