बेळगाव शहरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच, नार्वेकर गल्लीत उभारण्यात आलेल्या ‘ओल्ड मॅन’ ऐवजी चक्क झोपाळ्यावर बसलेल्या एका वृद्ध महिलेची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

दरवर्षी जुन्या वर्षातील कटू आठवणींना निरोप देण्यासाठी ‘ओल्ड मॅन’चे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा नार्वेकर गल्लीतील तरुण मंडळाने प्रथमच ‘ओल्ड वुमन’ची प्रतिकृती साकारली आहे. झोपाळ्यावर बसलेली ही प्रतिकृती इतकी हुबेहूब आहे की, ती पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा भास होतो.
ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ही वृद्धेची आकृती पाहून काही लहान मुले घाबरत आहेत, तर काही तरुण उत्साहाने या प्रतिकृतीसोबत फोटो आणि सेल्फी घेत आहेत. ही प्रतिकृती पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत असून, यंदा ‘ओल्ड वुमन’ची संकल्पना राबवल्याबद्दल चर्चा रंगली आहे.


Recent Comments