बेळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत.


बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. ‘बिम्स’ रुग्णालयात अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. दलितांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत दलित नेते विजय तळवार यांनी शहरातील आरपीडी सर्कलला ‘वीर मदकरी नायक’ यांचे नाव देऊन त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वनविभागातील पदोन्नतीबाबत बोलताना डीएफओ क्रांती यांनी सांगितले की, वनविभाग आणि समाजकल्याण विभागाची समन्वय बैठक पार पडली असून लवकरच दुसऱ्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या बैठकीस जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसर्गी आणि दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments