मराठा मंडळ पॉलिटेक्निक माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘एकत्वम’ या शीर्षकाखाली माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांची मुख्य अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी, उपप्राचार्या आशा तोरवी, सचिव चेतन बैलूर, खजिनदार सचिन वांगीकर, उपाध्यक्ष शोधन चौगुले, शिवानी पाटील आणि मानसी सोमनाचे उपस्थित होते.

या मेळाव्यात शंभरहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाखेत सरकारी शुल्काची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. तसेच माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पॉलिटेक्निकला उच्च दर्जाची साउंड सिस्टम भेट देण्यात आली. सिव्हिल विभागाचे माजी विद्यार्थी विश्वनाथ लेक्कड यांनी संस्थेला १ लाख रुपयांची देणगी दिली.

दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग पिंगट, दीपक तरळे, गौरी उप्पीन, बापूराव मोरे आणि विद्यार्थी समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले.



Recent Comments