hubbali

राज्य सरकारकडून गॅरंटी योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक : आम. महेश टेंगिनकाई

Share

कर्नाटक सरकार गृहलक्ष्मी योजनेचा निधी वितरीत करण्यात अपयशी ठरले असून गॅरंटी योजनांच्या नावाखाली महिलांची मोठी फसवणूक केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेचा निधी रखडल्याने राज्यातील माता-भगिनींचा सरकारला शाप लागेल, असे प्रतिपादन आमदार महेश टेंगिनकाई यांनी केले.

हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना टेंगिनकाई यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या पाच हजार कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर विविध विभागांकडून विसंगत उत्तरे मिळत असून, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे अद्याप जमा झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी चूक कबूल करूनही २० दिवस उलटल्यानंतरही १ कोटी २४ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. सरकारने थकीत रक्कम त्वरित जमा न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकार महिलांच्या हक्काचा पैसा दाबून ठेवत असून प्रशासनाला माहिती लपवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया महेश टेंगिनकाई यांनी व्यक्त केली.

Tags: