विजापूर शहरातील सोलापूर रस्त्यावर असलेल्या उडुपी कृष्ण पॅलेस हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत तीन मजली हॉटेलची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून, आगीचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


Recent Comments