Belagavi

सिद्धरामय्यांनी स्वतःहून सत्ता सोडली तरच दुसऱ्यांना संधी: डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामी

Share

कर्नाटकातील नेतृत्वबदलाच्या चर्चेवर कोडीमठ संस्थानचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी मोठे भाकीत वर्तवले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतःहून पद सोडले तरच दुसऱ्या नेत्याला संधी मिळेल, अन्यथा त्यांच्याकडून सत्ता काढून घेणे अशक्य असल्याचे स्वामीजींनी बेळगावात स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतःहून सत्ता सोडली तरच दुसऱ्यांना संधी मिळेल, अन्यथा त्यांच्याकडून सत्ता काढून घेणे कठीण आहे, असे भाकीत कोडीमठ संस्थानचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी बेळगावात वर्तवले. सिद्धरामय्या जोपर्यंत स्वतःहून पद सोडत नाहीत, तोपर्यंत डी.के. शिवकुमार यांना संधी मिळणे कठीण असल्याचे संकेत त्यांनी दिले. संक्रांतीनंतर सूर्याच्या उत्तरायणामध्ये राजा, महाराजा आणि व्यापाऱ्यांचे भविष्य अधिक स्पष्ट होईल, असे सांगतानाच त्यांनी २०२६ हे वर्ष अधिक कठीण असल्याचे भाकीत केले. या काळात जगाचा काही भाग नैसर्गिक संकटात सापडण्याची शक्यता असून केंद्रातही राजकीय पेच निर्माण होऊ शकतो, असे स्वामीजींनी नमूद केले.

Tags: