बेळगाव तालुक्यातील काकती येथील यमनापूर गल्लीतील रहिवासी, शतायुषी यशोदा अमृत पाटील (१०५) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. यशोदा पाटील या काकती येथील प्रसिद्ध मूर्तिकार जयवंत अमृत पाटील यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर, सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता काकती येथील स्मशानभूमीत अस्थी विसर्जन विधी होणार असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.


Recent Comments